अर्थसंकल्पाचे शेअर बाजाराकडून स्वागत, सेन्सेक्समध्ये ६५० अंकांची वाढ
(01-03-2011 : 18:06:38)
मुंबई दि. १ - केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काल सादर केलेल्या २०११-१२च्या अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींमुळे उद्योगजगतात पसरलेल्या आनंदाचे पडसाद मुंबई शेअर बाजारातही उमटले व सेन्सेक्समध्ये तब्बल ६४९.५७ अंकांची वाढ झाली. वाहन उद्योग, भांडवली क्षेत्र तसेच बँकांच्या समभागांना बाजारात विशेष मागणी होती. दिवसभराचे कामकाज संपले तेव्हा सेन्सेक्स १८ हजार ४७२.९७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीतही १९५.२० अंकांची वाढ होऊन तो ५५२८.४५ अंकांवर बंद झाला.
No comments:
Post a Comment